एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर....; महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना दमबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे. 

पुणे - शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’मुळे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे वर्ग ऑगस्ट महिन्यात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाने निकाल लावण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. शहरातील महाविद्यालयांनी द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयात अनुदानित व विना अनुदानित वर्ग आहेत.

Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा?

पारंपरिक बीएससी, बीकॉम, बीए या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. तर, बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ३५ ते ४० हजाराच्या पुढे आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या आतच संपूर्ण शुल्क भरावे असे आदेश दिले आहेत. 

शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच हप्त्यांमध्ये शुल्क भरता आले पाहिजे अशी मागणी करत महाविद्यालयांना ईमेल पाठवत आहेत. मात्र त्यांना दिलासा न मिळाल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. 

लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी!

ज्या विद्यार्थ्यांना पैसे भरणे शक्‍य आहे त्यांनी भरावेत. ज्यांना शक्‍य नाही, अशांसाठी महाविद्यालयांनी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत दिली पाहिजे. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे, त्यामुळे एकदम शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे.
- आकांक्षा चौगुले, अध्यक्ष,  स्टुडंट हेल्पींग युनिटी

मी शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत आहे. वर्षभराचे शुल्क ३६ हजार रुपये आहे. हे एकरकमी मला भरता येणार नाही, असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी सद्यस्थिती पाहून सवलत दिली पाहिजे.
- एक विद्यार्थी

पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आवाहन 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा यंदा ऑनलाइन होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज करवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना १३ ते २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. २० जुलैपर्यंत नियमित शुल्कासह व नंतर विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाला अंतिम वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्‍यक आहे. अधिक माहिती convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: college warning to student for school fee