लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाचा संसर्ग व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो आहे. दुकानासमोर वस्तू खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला सहकार्य करावे.​

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधानंतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता.१३) चर्चा केली. त्यावेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, यांच्या अध्यक्षते खाली आज बैठक झाली. विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घटटे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.

Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?​

यावेळी सौरभ राव म्हणाले, व्यापारी, दुकानदार हे अर्थव्यस्थेचे मुलभूत स्त्रोत आहेत. नागरिकांकडून सुरक्षित अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापरही दिसत नाही, यामुळे कोरानाबाधितांची संख्या वाढते आहे. कोणत्याही व्देषभावनेतून व्यापारी बांधवांवर कारवाई करण्यात येत नसून पुणे शहर व जिल्हयाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. पुणे व्यापारी महासंघाची कायम सहकार्याची भूमिका राहिली आहे, यापुढेही आपण कोरोनाच्या उच्चाटनासाठी मिळून काम करू व नक्कीच कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी करू.' 

पुणे विद्यापीठात गैरव्यवहार? आदेश झुगारत 'ते' पैसे वाटलेच कसे?

विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, 'पुणे व्यापारी महासंघाने कायम शासनाला सहकार्य केले आहे. लॉकडाऊनबाबतही सहकार्य अपेक्षित आहे.' तर जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'कोरोनाचा संसर्ग व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो आहे. दुकानासमोर वस्तू खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला सहकार्य करावे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी 'पुणे शहरात व्यापारी वर्गावर 10 लाख म्हणजेच २५ % नागरिक अवलंबून आहेत आणि ते सर्व आज संकटात आहेत. व्यापाऱ्यांना कोणतीही सूट, सुविधा किंवा अनुदान सरकारकडून मिळत नाही, काही  व्यापाऱ्यांनी आत्महत्या करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. व्यापाऱ्यांमध्ये भयंकर असंतोष असून येणाऱ्या काळात याचा उद्रेक होऊ शकतो व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असे यावेळी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर राव यांनी हा शेवटचा लॉकडाउन असून यापुढे लॉकडाउन चा 'ल' सुद्धा असणार नाही, व्यापाऱ्यांनी यापूर्वीही सहकार्य केले आहे, आता पुन्हा एकदा शेवटचे सहकार्य करा अशी विनंती केली. तेंव्हा व्यापारी महासंघाने लॉकडाउनला सहमती दिली.

आम्ही शासनास सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्गचा वाढता धोका विचारात घेत पहिल्या पाच दिवसानंतर पुढील पाच दिवसासाठी लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता आणता येईल याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Chamber of Commerce has expressed readiness to cooperate with administration regarding lockdown