Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा?

Corona-Police-Action
Corona-Police-Action

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी तब्बल सात हजार पोलिस रस्त्यावर असणार आहेत.

पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी स्वयंशिस्त आणि संयम बाळगावा, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. 

"पुणे पोलीस नागरिकांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. प्रशासन आणि पोलिसांची भूमिका आणि कळकळ नागरिकांनी समजून घ्यावी, तसेच कायदेशीर कारवाईची वेळ येऊ न देता  पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिसवे यांनी केले. 

शिसवे म्हणाले...
- नागरिकांमध्ये प्रबोधनासाठी पोलिसाकडून व्हिडिओ सिस्टमचा वापर 
- प्रत्येक नाकाबंदी ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शहानिशा करण्यात येईल. 
- विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई होणार
- नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी पोलिसांकडून खबरदारी
- नागरिकही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, अशी अपेक्षा
- सात हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर

लॉकडाऊनमध्ये प्रशासनातर्फे ज्या घटकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांना डिजिटल पास देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक कामे, वैद्यकीय कारण व मृत्यु या कारणसाठी www.punepolice.in याद्वारे पास देण्यात येणार आहे. तसेच उद्योग, कंपन्याच्यासमवेत पुणे पोलिसांची चर्चा झाली.

त्यानुसार उद्योग, कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराना त्या-त्या उद्योग, कंपन्याच्या मनुष्यबळ विभागाने त्यांच्या कामगारांना वाहन वापरण्यासाठी परवानगीचे पत्र द्यावे, संबंधीत पत्र, कंपनीचे ओळखपत्र कामगारांनी स्वतः जवळ ठेवावे. नाकेबंदी ठिकाणी पोलिसांना ही कागदपत्रे दाखवावित, असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com