esakal | ऐकावे ते नवलच, पौर्णिमेच्या रात्रीत स्मशानभूमीत रंगली काव्यमैफील  
sakal

बोलून बातमी शोधा

dorlewadi

या कार्यक्रमासाठी रात्री दहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसरात स्वच्छता केली. त्यानंतर परिसरात खड्डे खोदून

ऐकावे ते नवलच, पौर्णिमेच्या रात्रीत स्मशानभूमीत रंगली काव्यमैफील  

sakal_logo
By
सोमनाथ भिले

डोर्लेवाडी (पुणे) : एरव्ही स्मशानभूमी अंत्यविधी, सावडणे, दशक्रिया या कार्यक्रमासाठी ओळखली जाते. मात्र, भिती वाटणाऱ्या ठिकाणी पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात कवितांची मैफील, चारोळ्या, स्नेहभोजन, वृक्षरोपण आदी कार्यक्रम रंगले. 

मंचरला आठवडे बाजार भऱणार तोही दोन दिवस

जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेनिमित्त बारामती तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे कार्यक्रम राबविण्यात आला. लोकांच्या मनात स्मशानभूमीबाबत असलेली भीती दूर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त

या कार्यक्रमासाठी रात्री दहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसरात स्वच्छता केली. त्यानंतर परिसरात खड्डे खोदून वडाच्या रोपाचे रोपण केले. मांसाहारी जेवण करत तेथेच कवितांची मैफिल रंगवली. तसेच, लोकांना फसवणारे जादूचे प्रयोग कसे केले जातात, हे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. चारोळ्या, प्रबोधन गीते व अनेकांनी सादर केलेली कवितांची मैफिल यावेळी चांगलीच रंगली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऍड. सचिन वाघ, विपुल पाटील, अमोल काटे, ऋतुराज काळकुटे, राहुल जगताप, राहुल झाडे, योगेश वाघ, विकास बाबर, आदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, मच्छिन्द्र टिंगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.