esakal | दिलासादायक : जुन्नर तालुक्यातील `ही` पाच गाव झाली कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona logo1.jpg

जुन्नरला पाच गावातील तेरा रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी पुन्हा गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

दिलासादायक : जुन्नर तालुक्यातील `ही` पाच गाव झाली कोरोनामुक्त

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) :  जुन्नरला पाच गावातील तेरा रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी पुन्हा गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तालुक्यातील कोरोना मुक्त गावे व बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:- सावरगांव (५), मांजरवाडी (२), धोलवड (३), आंबेगव्हाण (२), डिंगोरे (१).

पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!

कोरोनाच्या रुग्णांनी शुक्रवारी (ता. ५) पंचविशी पार केली होती. एकूण २६ रुग्ण संख्या झाली होती. आज शनिवार ता. ६ अखेर एकूण १३ रुग्ण बरे झाले आहेत. लेण्याद्री कोविड सेंटर मधून सात तर पुणे येथून सहा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. औरंगपूर येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. शुक्रवारी कुरण तर आज ओतूर व चिंचोली येथे नव्याने चार रुग्ण मिळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गावनिहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे :- डिंगोरे - १ (बरा), औंरगपूर - १ (मृत्यु), सावरगांव - ५ (बरे),धोलवड - ३ (बरे), आंबेगव्हाण - २ (बरे),  मांजरवाडी -२ (बरे), पारुंडे - ३,खिलारवाडी - १, धालेवाडी तर्फे मिन्हेर - १, विठ्ठलवाडी-वडज - १, शिरोली तर्फे आळे - २, ओतूर - २ कुरण - १, चिंचोली - १.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना मुक्त गावांनी अशी काळजी घ्यावी

१. मुंबई व पुणे बाहेरून आलेल्या लोकांचे शाळा, समाजमंदिरा मध्ये ठेवून संस्थात्मक विलगिकरण करावे. 
२. गावातील लोकांना बाहेरून आलेल्यांनी आपली माहिती लपवून ठेऊ नये.
३. सर्दी, खोकला, ताप असेल तर सरकारी दवाखान्यात जावे.
४. होम तसेच संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तिंनी गावात फिरू नये. 
५. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा.
६. सॅनिटायझरचा वापर करावा. 
७.वारंवार हात साबणाने धुवावेत. 
८.सोशल डिस्टन्स पाळावे. 
९.कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

loading image
go to top