बारामती : कोऱ्हाळेतील ज्येष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथील कोरोनाबाधित वृद्धाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.

वडगाव निंबाळकर : कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथील कोरोनाबाधित वृद्धाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
शनिवार (ता. ३०) रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कुटुंबातील संपर्कात आलेल्या एकूण 18 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये ज्येष्ठाच्या पत्नीसह चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, प्रथम बाधा झालेल्या ज्येष्ठाला बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ९० वर्ष वय असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी 3 जून रोजी पुण्याला हलविण्यात आले. उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित झालेल्या त्या कुटुंबाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाकडून चालू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizen Died Due to Corona Infection in Korhale Baramati