
पुणे - ‘पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यात आपल्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे कृत्य काही दहशतवाद्यांनी केले होते. तेव्हापासून त्यांना यमसदनी पाठविण्याची देशवासीयांची इच्छा होती. हल्लेखोर आतंकवादी मारले गेले पाहिजे, अशी खदखद प्रत्येकाच्या मनात होती. ते आज ऑपरेशन महादेवाच्या माध्यमातून मारले गेले आहेत. भारतीय सैन्याने केलेली ही कामगिरी अभिनंदनीय आहे,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.