व्यावसायिक वाहन 3 मिनिटांत बाहेर न आल्यास दंड 

व्यावसायिक वाहन 3 मिनिटांत बाहेर न आल्यास दंड 

पुणे - प्रवासी घेण्यासाठी कार किंवा बस विमानतळाच्या आवारात गेल्यावर तीन मिनिटांत त्यांनी वाहनात बसून बाहेर यायला हवे अन्यथा त्यांना 340 रुपये दंड होणार आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील शुल्कही निश्‍चित झाले असून त्याची अंमलबजावणी पाच मार्चपासून होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या बाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. 

विमानतळाच्या आवारातून प्रवाशांना "पिकअप' करण्यासाठी व्यावसायिक वापराचे वाहन (कॅबसह) गेल्यास तीन मिनिटांसाठी त्यांना 50 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र, तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन आवारात थांबल्यास त्यांना 340 रुपये दंड होणार आहे. हे तीन मिनिटे मोजण्यासाठी आवारात प्रवेश करताना प्रत्येक वाहनाला संगणकीकृत पावती दिली जाईल. बाहेर पडताना त्या पावतीवरील वेळ बघून दंड आकारणीचा निर्णय होणार आहे. आवारातील ओला- उबरचा स्टॅंड वाहनतळ क्रमांक दोन मध्ये हलविण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या वाहनांची कोंडी होणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. वाहनतळावर कोठेही वाहन उभे केल्यास 340 रुपये दंड होणार आहे. विमानतळाच्या आवारात दुचाकी वाहनांना बंदी असेल. खासगी वापराच्या वाहनांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 

वाहनतळ क्रमांक दोनवरून प्री- पेड रिक्षा, प्री-पेड टॅक्‍सी, ओला- उबरकडून वापरला जाईल. या वाहनतळावर वाहने उभी करता येणार नाहीत. वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ क्रमांक एक वापरला जाईल. वाहनतळावरून बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वार निश्‍चित करण्यात आले आहे. त्याचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी केले आहे. 

वाहनतळावरील शुल्क 
- वाहन 30 मिनिटांसाठी - दोन तासांपर्यंत- सात तासांपर्यंत----- 24 तासांपर्यंत---------48 तासांपर्यंत 
- दुचाकी-------- 10 रुपये-------------------- 20--------------70-------------105-----------------140 
- मोटारी ---------30 रुपये-------------------- 85---------------185-------------255----------------510 
- बस -----------40 रुपये---------------------- 100--------------200-------------300-----------------600 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com