स्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे आयुक्तांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्यांविरोधात आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कचरा साठल्याने महात्मा फुले मंडईतील सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे.

पुणे - स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्यांविरोधात आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कचरा साठल्याने महात्मा फुले मंडईतील सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच, रस्त्याची सफाई न झाल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.

शहराच्या विविध भागांत पाहणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या मिळकतींसह खासगी आणि अन्य व्यावसायिक ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून राव यांच्यासह अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी गुरुवारी मंडई परिसराला भेट दिली. त्या वेळी मिसाळ वाहनतळाच्या आवारात कचरा आणि पाणी साचल्याने ठेकेदार निखिल जगताप यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

व्यावसायिकांनी स्वच्छतेच्या उपाययोजना न केल्याने दंडात्मक कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner crime for Cleaning Ignore