Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scam
Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scamsakal

Shailaja Darade : राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक

नोकरीच्या आमिषाने ४४ जणांची पाच कोटींची फसवणूक

पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने ४४ जणांची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्तांना अटक करण्यात आली आहे.

शैलजा रामचंद्र दराडे (रा.पाषाण) असे अटक केलेल्या तत्कालीन आयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत होते. जून २०१९ मध्ये त्यांची दादासाहेब दराडे याच्याशी ओळख झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सूर्यवंशी यांना सांगितले.

मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे आमिष त्याने फिर्यादी यांना दाखवले. त्या बदल्यात त्याने सूर्यवंशी यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यवंशी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी शैलजा दराडे या त्यांच्या भावामार्फत डी.एड. झालेल्यांकडून सुमारे १२ तर बी.एड. झालेल्यांकडून सुमारे १४ लाख रुपये घेत होत्या. या प्रकरणी त्यांना गेल्या महिन्यात निलंबन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com