'कॉमन मॅन'नंही घातला मास्क; पुणेकरांनो, आता तरी मास्क घालणार की नाही?

Common_Man
Common_Man

पुणे : पुण्यातील 'कॉमन मॅन'नेही घातला मास्क असं म्हटलं अन् अनेकांच्या भुवया उत्सुकतेने ताणल्या गेल्या. होय, शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याने आता दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'ने देखील मास्क घातला आहे. आणि अनोख्याप्रकारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करत आहे.

सेनापती बापट रस्त्यातील सिंबायोसिस विश्वभवन येथील प्रतिष्ठित "कॉमन मॅन" पुतळयाला मास्क परिधान करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सजग करण्यासाठी आर. के. लक्ष्मण यांच्या "कॉमन मॅन"च्या पुतळ्याला मास्क घालण्यात आला. कोरोनाच्या संकटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी 'मास्क'चे महत्व लोकांना पटवून देण्याच्या उद्देशाने 'सिंबायोसिस'तर्फे अश्याप्रकारे जनजागृती करण्यात आली.

सिंबायोसिसमध्ये उभारण्यात आलेला हा कॉमन मॅनचा पुतळा पुणेकरांसाठी विशेष असाच आहे. सेनापती बापट रस्त्याने जाणाऱ्या जवळपास प्रत्येक नागरिकाचे लक्ष्य हा पुतळा वेधून घेतो. तसेच पुणेकरांना वेळोवेळी सामाजिक संदेशही हा पुतळा देत असतो.

महापालिका, जिल्हा तसेच पोलिस प्रशासन मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. मात्र, तरीही काही नागरिक त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही.

त्यामुळे आता कॉमन मॅनने या कामी पुढाकार घेतला आहे. स्वत:चे आणि इतरांचेही रक्षण करणे ही आपली सर्वांची भूमिका आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी मास्क वापरण्यासारख्या महत्त्वाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असा संदेश कॉमन मॅन देत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com