वेगवेगळ्या 'स्किल्स'वर असेल कमांड, तर कंपन्यांमध्ये तुम्हाला मिळणार डिमांड!

Jobs
Jobs

पुणे : "लाॅकडाऊनमुळे काही क्षेत्रात रोजगार कमी झाला आहे. मात्र, अन्न प्रक्रिया, कृषी, औषध निर्माण, केमिकल, सॅनिटाझेशन या क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आयटीआय केलेल्या कुशल कामगारांसाठी छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांना नोकरी नक्की मिळते, त्यामुळे कौशल्य आत्मसात करा," असे आवाहन उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. 

"मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर'तर्फे (एमसीसीआयए) 'रोजगार: संधी आणि आव्हाने' या विषयावर वेबीनार आयोजित केला होता. त्यामध्ये प्रविण मसालेचे आनंद चोरडिया, थरमॅक्स कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष शरद गांगल, सिमेन्स इंडिया कंपनीच्या प्रोजेक्ट अँड मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख मनोज बेलगांवकर, एसकेएफ कंपनीचे एचआर हेड जेकप वर्गीस, हिरेन देवगी सहभागी झाले होते. एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी या कार्यक्रमामध्ये संवादक म्हणून भूमिका बजावली. 

शरद गांगल म्हणाले, "रोजगार शोधताना लगेच मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल असे नाही, तर छोट्या उद्योगात संधी मिळाली तर तेथून सुरवात करा. उद्योगांमध्ये स्किल असलेल्या कामगारांची गरज आहे. त्यामुळे आयटीआय केलेले वेल्डर, फिटर यांना मागणी आहे. पुढील काळात वेअर हाऊस क्षेत्रात चांगले दिवस येणार आहेत."

मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे सिग्नलिंग, टेली कम्युनिकेशन, इलेक्ट्रीक यामध्ये संधी आहे. औषधनिर्माण, अन्न प्रक्रिया उद्योग, लाॅजिस्टीक सर्व्हिस, सोलार इंस्टाॅलेशन-मेन्टेनन्स, स्मार्ट मीटर इंस्टाॅलेशन हे क्षेत्र पुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने तेथे नोकरीची संधी जास्त आहे," असे मनोज बेलगांवकर यांनी सांगितले. 

"आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनबद्दल इतर देशांची भूमिका बदलली आहे, त्यामुळे हे देश चीनमधून ज्या गोष्टी आयात करत होते, ते आता भारतातून मागवत आहेत. यात विशेषतः वाहन उद्योगाला लागणारे स्पेअर पार्टचा समाज आहे. त्यामुळे अनेक छोट्या कंपन्यांनाही संधी आहे," असे हिरेन देवगी यांनी सांगितले. 

केमिकल, शिक्षण, औषध, आरोग्य या क्षेत्रात नोकरी उपलब्ध होईलच, पण सोशल डिस्टन्सिंगमळे पुढील काळात वाहन खरेदी वाढेल, त्यामुळे वाहन उद्योगात आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या प्रशिक्षित कामगारांची गरज आहे. तसेच यापुढे कोणालाही पर्मनंट नोकरी मिळणार नाही. प्रोजेक्टनुसार काम मिळेल, त्यामुळे जेवढे स्किल असतील, तेवढा रोजगार जास्त मिळेल." 
- जेकप वर्गीस, एसकेएफ कंपनी

"तरुणांनी कौशल्य विकसित केले, तर त्यांना मोठा रोजगार उपलब्ध आहे. आपण कोरोनाप्रमाणे बेरोजगारीवरही मात करू शकतो. एकाच स्किलवर अवलंबून न राहता, अनेक गोष्टी शिका, जागतिक बाजारपेठेप्रमाणे आपल्यालाही बदलावे लागेल."
- अनंत चोरडिया, प्रविण मसाले

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com