esakal | Pune : ‘मराठीच्या भल्यासाठी’ संस्थेची पुनर्रचना
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : ‘मराठीच्या भल्यासाठी’ संस्थेची पुनर्रचना

Pune : ‘मराठीच्या भल्यासाठी’ संस्थेची पुनर्रचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ती व्यवहारामध्ये वापरली जावी यासाठी ‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेने आता कंबर कसली आहे. त्या अंतर्गत मराठी भाषा विकास प्राधिकरण, मराठी विद्यापीठ त्याच बरोबर विज्ञान-तंत्रज्ञानाची पुस्तके अस्खलित मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय अभियान सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, मराठी विद्यापीठ अशा मराठी भाषा विकासाच्या मागण्यांबाबत शासनाशी संवाद साधण्यासाठी ‘मराठीच्या भल्यासाठी’ ही संस्था यापूर्वी मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. या संस्थेची पुनर्रचना महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आली. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली. त्या वेळी संस्थापक अध्यक्ष कर्णिक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह समितीचे सहस्य उपस्थित होते.

ठाले पाटील म्हणाले, “आधुनिक काळात मराठी व्यवहारातील भाषा म्हणून मागे पडत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा विकास प्राधिकरणाचा कायदा केला पाहिजे, असा ठराव यात करण्यात आला.” ‘मराठीच्या भल्यासाठी’ संस्थेने केलेली मराठी विद्यापीठाची मागणी तत्त्वतः मान्य केली. आता हे विद्यापीठ येत्या शैक्षणीक वर्षापासून सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशमुख म्हणाले, “उत्तम इंग्रजी बरोबरच उत्तम मराठी आले पाहिजे. हे भाषा संस्कार मुलांवर आता करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ही संस्था कार्य करेल.”

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

"मराठीच्या भल्यासाठी" ची नवी कार्यकारिणी-

मार्गदर्शक / संस्थापक अध्यक्ष- मधू मंगेश कर्णिक

अध्यक्ष : कौतिकराव ठाले पाटील - औरंगाबाद

कार्याध्यक्ष : लक्ष्मीकांत देशमुख

उपाध्यक्ष

प्रा. मिलिंद जोशी : कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

प्रा. उषा तांबे : कार्याध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई

डॉ दादा गोरे : मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद

डॉ. रविंद्र शोभणे : विदर्भ साहित्य संघ, नागपूर

डॉ. अशोक ठाकूर : अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद

विजय चोरमारे : अध्यक्ष दक्षिण मराठी साहित्य परिषद

कोषाध्यक्ष : रेखा नार्वेकर - विश्वस्त कोकण मराठी साहित्य परिषद

प्रमुख कार्यवाह

चंद्रशेखर गोखले : जिल्हा अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद

loading image
go to top