निमगाव येथे मुस्लिम ट्रस्टतर्फे सामुदायिक विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

निमगाव केतकी - येथील श्री केतकेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे सोमवारी (ता.१४) इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व तालुका युवक मुस्लिम संघटना यांच्यातर्फे मुस्लिम धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात झाला. तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या सोहळ्यात तेरा विवाह लावण्यात आले. विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने सर्वधर्मीय लोक उपस्थित होते.

चॅरिटेबल ट्रस्टने सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. धार्मिक विधीचे शादीचा निकाह शब्बीर काझी यांनी पढविला. नव वधू-वरांना कपडे, संसारोपयोगी वस्तू ट्रस्टतर्फे देण्यात आल्या. सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे  अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती मयूरसिंह पाटील, सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, छत्रपतीचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, अभिजित तांबिले, सरपंच छाया मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 
ट्रस्टचे अध्यक्ष रशीद मुलाणी, सचिव मुक्तार मुलाणी, युवकचे तालुकाध्यक्ष समीर मुलाणी, उपाध्यक्ष मुसा पठाण, सर्फराज पठाण, उजेर शेख, अस्लम मुलाणी, प्रा. शहानूर मुलाणी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. विवाहपूर्वी सकाळी आमदार दत्तात्रेय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सोहळ्यास हजेरी लावून नव वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजात सुरू केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होत असल्याने या उपक्रमाचे भरणे यांनी कौतुक केले.

Web Title: community marriage event by muslim trust