श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानातर्फे सामुदायिक विवाह सोहळे संपन्न

दत्ता म्हसक
रविवार, 13 मे 2018

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सामुदायिक विवाह समारंभ यावर्षी आयोजित करण्यात आला. यात सहा सामुदायिक सोहळे तर 38 विवाह पार पडल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली.

जुन्नर: श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सामुदायिक विवाह समारंभ या वर्षी आयोजित करण्यात आला. यात सहा सामुदायिक सोहळे तर 38 विवाह पार पडल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली. श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यानुसार समाजातील गोरगरीब व आर्थिक दृष्टीने कमकुवत शेतकरी, शेतमजुर यांच्या मुला-मुलींच्या विवाहाकरिता सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधु - वरांकडून एका विवाहाकरिता रु. 21000 /- घेऊन देवस्थानचे वतीने सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. शनिवारी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 विवाह पार पडले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई व इतर मान्यवर उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: community marriage organised by shri kshatra lenyandri Junnar

टॅग्स