समाजाचा पाठिंबा सैनिकांसाठी महत्त्वाचा - भूषण गोखले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

‘अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व यांचा दृढ संबंध आहे. आपले कुटुंब मागे ठेवून जेव्हा सैनिक सीमेवर लढत असतो तेव्हा अध्यात्म त्याला शांत राहण्यासाठी मदत करते. सैनिकांच्या मागे त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समाज उभा आहे, ही त्याची भावना असते. समाजाचा सैनिकांना असणारा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे,’’ असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व यांचा दृढ संबंध आहे. आपले कुटुंब मागे ठेवून जेव्हा सैनिक सीमेवर लढत असतो तेव्हा अध्यात्म त्याला शांत राहण्यासाठी मदत करते. सैनिकांच्या मागे त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समाज उभा आहे, ही त्याची भावना असते. समाजाचा सैनिकांना असणारा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे,’’ असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोखले यांनी ‘प्राउड टू बी ॲन इंडियन’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी डॉ. अनिल गुगळे, डॉ. सुप्रिया गुगळे, वैद्य सुविनय दामले, फेमिना मिसेस इंडिया लीना जैन, ‘डॉक्‍टर फॉर बेगर्स’चे अभिजित सोनावणे, हृषीकेश पत्की, शर्वरी लोहोकरे, ब्रह्माकुमारी सरितादीदी, संजीवनीदीदी, डॉ. अरविंद संगमनेरकर उपस्थित होते.

गोखले म्हणाले, ‘‘चांगला विचार करा, सकारात्मक राहा आणि चांगल्या कृती करा. मुलांना शिस्त लावा; पण त्यांना धाकात ठेवून संवाद बंद करू नका. मुलांशी संवाद साधणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांशी मैत्री करायला हवी. एक जीव जन्म घेताना केवळ स्रीने नाही, तर पुरुषांसाठीदेखील गर्भसंस्कार महत्त्वाचे आहेत.’’

पुणे : कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदुत्व टिकले. परंतु, त्यांनी इतर धर्मांचाही सन्मान केला. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना कोणताही धर्म माहिती नसतो. त्यांच्यासाठी भारतीय हा एकच धर्म असतो आणि याच भावनेने ते आपल्यासाठी लढत असतात, असे ते म्हणाले.

वैद्य सुविनय दामले म्हणाले, ‘‘आपला भारतीय आहार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण, आज डाएटच्या नावाखाली आपण त्याचे महत्त्व लक्षात घेत नाही. आपला आहार हा पंचेंद्रियांच्या साह्याने ग्रहण करणे गरजेचे आहे. कोणत्या सणात आणि ऋतूत काय खावे, याचा विचार प्रत्येकाने करावा.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Community support important to soldiers