नऱ्हेमधील कंपनी आगीत जळून खाक

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

खडकवासला : नऱ्हे येथील गंधर्व हॉटेल जवळील व्हीस्मार्ट थर्मोस्टेट या इलेक्ट्रॉनिक साहित्य बनविणाऱ्या कंपनीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान, कंपनी बंद असल्याने आत कोणी नसल्याने कोणी जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. परंतु कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

चौधरी नावाच्या व्यक्तीने अग्निशामक दलास ही माहिती कळविली. त्यानंतर, सिंहगड रोड व कात्रज येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने मुख्यालयातून 3 पाण्याचे टँकर पाठविण्यात आले. छताचे पत्रे उचकटून खिडक्यांच्या काचा फोडून धुराला रस्ता करून देण्यात आला.
साहित्य तयार करण्यासाठी पुट्ठे असल्याने आग पुन्हा सुरू होत असल्याने विझवण्याचे काम सकाळी 9 वाजेपर्यंत सुरूच आहे. अजून दीड दोन तास काम सुरू राहील असे अग्निशामक दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराठकर यांनी सांगितले आहे.

Web Title: a company catches fire in narhe