खडकीतील महाराष्ट्र सिव्हिल फोर्सची कौतुकास्पद कामगिरी 

maharashtra.jpg
maharashtra.jpg



 पुणे ः येथील महाराष्ट्र सिव्हिल फोर्स आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापनातील जवानांनी पंढरपूर व मुंबईतील वांगणी येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत रक्षणाचा संकल्प पूर्ण केला आहे. पंढरीच्या वारीदरम्यान चंद्रभागेला आलेल्या पुरातून अनेक वारकऱ्यांना या संस्थेच्या जवानांनी जीवदान दिले. त्यांच्या या कार्याचे एनडीआरएफच्या जवानांनी कौतुक केले असून, स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या या संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

पंढरपूर येथे या संस्थेने अनेक जखमींना व पूरग्रस्तांना औषधपाण्याची व्यवस्था केली. तसेच मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वांगणी येथे अडकलेल्या महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीला या संस्थेचे जवान धावून गेले होते. आपत्तीच्या काळात लोकांना जमेल तशी मदत करण्याचा वसा उचललेल्या या संस्थेत सध्या 132 जवानांचा समावेश आहे. यात काही महिलादेखील आहेत. यांना निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांकडून कमांडोचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. संकट काळात कशा पद्धतीने मदत करायची, याचे धडे दिले जातात, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयपाल दगडे पाटील यांनी दिली. दरम्यान, पूरसदृश स्थितीत व पुरानंतर लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती पाटील यांनी या वेळी दिली. 


आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी 

- सर्वप्रथम नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 
- रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र आदी प्रसारमाध्यमांकडील ताजी माहिती ठेवावी. 
- पाळीव प्राण्यांना बांधून ठवू नये. 
- सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 
- पुराचे पाणी ओसरताच ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी. 
- विजेच्या खांबांना हात लावू नये 
- पाणी उकळून प्या. 
- आपत्कालीन संपर्क क्रमांक कायम आपल्या जवळ ठेवावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com