esakal | अकरावीसह आयटीआय, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रंगणार चुरस

बोलून बातमी शोधा

ITI with eleven, will be painted for admission to the diploma course
अकरावीसह आयटीआय, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रंगणार चुरस
sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळासह अन्य मंडळांनी घेतला आहे. परिणामी पुढील शैक्षणिक वर्षात दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहेत. त्यामुळे अकरावी असो, आयटीआय असो वा पदविका असो या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चांगलीच चुरस रंगणार असल्याचे दिसून येते. परंतु दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी ही चुरस कमी करण्यासाठी आणि गेली वर्षभर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासक्रमाचे योग्यरितीने आणि अचुक मूल्यांकन व्हावे यासाठी त्याचे निकष ठरविताना राज्य सरकारने पुढील शैक्षणिक वर्षांचा आणि प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: नव्या स्ट्रेन विरुद्ध दोन्ही लसी कार्यक्षम; शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण

राज्यात यंदा १५ लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर दरवर्षी राज्यात इतर मंडळातील ५० ते ६० हजारांच्या आसपास विद्यार्थीं अकरावीसाठी प्रवेश घेतात. यंदा बोर्डाची परीक्षा नसल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यंदा कोणता निकष लावला जाणार याबाबत विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता असल्याचे निदर्शनास येत आहे.

दहावीनंतर अकरावी, आयटीआय आणि पदविका अभ्यासक्रम निवडण्याचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. या तिन्ही अभ्यासक्रमाच्या मिळून अंदाजे आठ लाखांहुन अधिक जागा आहेत. यात यंदा निश्चितच भर पडणार आहे.  

हेही वाचा: 14 ऑक्सिजन प्लॅंटच्या खरेदीसाठी 48 तासांत जमा झाला 13 कोटींचा निधी

दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यातील अंदाजे जागा :

अकरावी (ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया) : ५,५९,३४४

आयटीआय : १, ४५, ०००

पदविका : १, ०५,०००

हेही वाचा: आता प्रवासासाठी पुन्हा ई-पास आवश्यक; कसा काढायचा?

‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मुल्यांकन पाहून पुढील प्रवेशाची दिशा ठरवावी लागणार आहे. परंतु हे सगळे करताना पालक आणि शिक्षकांना देखील परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. अंतर्गत मुल्याकंनाच्या आधारे पुढील अभ्यासक्रम निवडीचा मार्गाबाबत सल्ला देताना शिक्षक, पालकांची कसोटी लागणार आहे.’’

- चेतना पवार, पालक