esakal | नव्या स्ट्रेन विरुद्ध दोन्ही लसी कार्यक्षम; शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

Covishield Covaxin

नव्या स्ट्रेन विरुद्ध दोन्ही लसी कार्यक्षम; शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांसह ‘बी १६१७’ नावाचा भारतीय म्युटेशनही आढळते. डबल किंवा ट्रीपल म्युटेशन नावाने परिचित या सर्व स्ट्रेन विरुद्ध कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी प्रभावी ठरत आहेत. असा विश्वास देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिले आहे. त्याचबरोबर मास्क, शारिरिक अंतर आणि हात वेळोवेळी धुणे या (एसएमएस) त्रिसुत्रीसह लसीकरण हेच कोरोना विरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) वतीने ‘सार्स कोविड -२ विषाणूची जनुकीय शृंखला’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे, जीनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल, डीबीटीच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप, राजेश भूषण, डॉ. सुजीत सिंग, डॉ. सुधांशु व्रती, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) संचालक डॉ. प्रिया अब्राहम आदी उपस्थित होते. नव्याने येणाऱ्या कोविड स्ट्रेनची जनुकीय शृंखला निश्चित करणे, तसेच त्याचा उपचार आ

हेही वाचा: कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा

‘‘महाराष्ट्रात प्रामुख्याने बी.१.६१७ हा स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यालाच आपण भारतीय म्यूटेशन म्हणतो. कोणत्याही विषाणूच म्यूटेट होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्याच्या म्युटेशनमुळे आपल्या शरीरातील प्रतिपींडे कोरोना विषाणूच्या रिसेप्टर बायंडीग डोमेन ला शोधू शकत नाही. मात्र विषाणू मानवी पेशीवरील एसीई-२ या संग्राहकाला बरोबर शोधते. त्यामुळे संसर्ग होत आहे.’’

आरटी-पीसीआर टेस्ट अचूकच

नव्या स्ट्रेनमुळे आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट फाल्स निगेटीव्ह म्हणजेच चुकीचे येत असल्याची चर्चा सध्या आहे. मात्र, आरटीपीसीआर निदान चाचणी पूर्णतः अचूक आहे. कारण निदानासाठी वापरण्यात येणारी सर्व आम्ले हे सर्व प्रकारच्या नव्या म्युटेशनला शोधण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले. निदान चाचणी चुकीचे येण्यामागे नमूना घेतानाची चूक, रुग्णाने चाचणीसाठी केलाला उशीर किंवा इतर मानवी चुका असू शकतात, असे स्पष्टीकरण डॉ. अब्राहम यांनी दिले.

हेही वाचा: आता प्रवासासाठी पुन्हा ई-पास आवश्यक; कसा काढायचा?

बी.जे.ने शोधला भारतीय म्यूटंट

पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी अकोला आणि अमरावती येथील नमून्यांच्या आधारे सर्वात प्रथम ‘बी.१.६१७’ हा भारतीय म्यूटंट शोधला होता. त्या आधारे पुढली जनुकीय श्रुंखलेची पुष्टी करण्यात आली, अशी माहिती डॉ. सिंग यांनी दिले.

महत्वाचे निष्कर्ष

  • विषाणूमध्ये सातत्याने म्यूटेशन होत असतात. फक्त जे म्यूटेशन दीर्घकाळ टिकतात त्याला स्ट्रेन म्हणतात

  • देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे स्ट्रेन आढळतात

  • जो देश स्ट्रेन शोधतो त्या देशाचे नाव त्या स्ट्रेनला दिले जाते

  • कोरोना प्रसार केवळ नव्या स्ट्रेनमुळे वाढत नाही. तर प्रसार रोखण्यासाठी घातलेल्या नियम नागरिकांनी तोडले तर प्रसार वाढतो

  • भविष्यातही असे म्युटेशन किंवा नवीन स्ट्रेन येत राहणार

  • लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर अत्यवस्थ अवस्थेत जाण्याचे शक्यता अगदी अल्प

हेही वाचा: भरधाव वाहनचालक ‘स्पीडगन’च्या टप्प्यात

स्ट्रेनचे देशातील प्रमाण

म्यूटेशन ः ब्रिटन ः द अफ्रिका ः ब्राझील ः भारतीय (बी.१.६१७)

भारत ः १६४४ ः ११२ ः १ ः ७३२

महाराष्ट्र ः ६४ ः ६ ः १ ः ४२७

दिल्ली ः ४१५ ः २३ ः ० ः ७६

गुजरात ः ६० ः २ ः ० ः ०