‘महारेरा’ने फेटाळली बिल्डरविरोधी तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

महारेराचे न्यायिक अधिकारी बी. डी. कापडणीस यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी मंजूषा ज्ञानेश्‍वर भुसारी (रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दाखल केली होती. येमुल अँड संचेती असोसिएट्‌सचा हडपसर येथे ‘यश रेसिडेन्सी’ हा गृहप्रकल्प आहे. त्याची जमीन तक्रारदाराचे पती आणि इतरांकडून घेतली होती. त्याबदल्यात त्यांना तीन कोटी ७५ लाख रुपये देण्याचे ठरले. बिल्डरने सुरुवातीला भुसारी यांना २५ लाख रुपये दिले व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे दिली. तर, बिल्डरने भुसारी यांना दुसऱ्या प्रकल्पातून १ कोटी रुपये किमतीची सदनिका देण्याचा निर्णय घेतला.

पुणे - बांधकाम व्यावसायिक येमुल अँड संचेती असोसिएट्‌सविरोधात महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीमध्ये  (महारेरा) दाखल करण्यात आलेली तक्रार फेटाळण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महारेराचे न्यायिक अधिकारी बी. डी. कापडणीस यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी मंजूषा ज्ञानेश्‍वर भुसारी (रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दाखल केली होती. येमुल अँड संचेती असोसिएट्‌सचा हडपसर येथे ‘यश रेसिडेन्सी’ हा गृहप्रकल्प आहे. त्याची जमीन तक्रारदाराचे पती आणि इतरांकडून घेतली होती. त्याबदल्यात त्यांना तीन कोटी ७५ लाख रुपये देण्याचे ठरले. बिल्डरने सुरुवातीला भुसारी यांना २५ लाख रुपये दिले व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे दिली. तर, बिल्डरने भुसारी यांना दुसऱ्या प्रकल्पातून १ कोटी रुपये किमतीची सदनिका देण्याचा निर्णय घेतला. 

पुणे : शेतकऱ्यांनी परतवला बिबट्याचा हल्ला

या सदनिकेचा ताबा मार्च २०१५ पर्यंत देण्याचे ठरले होते. मात्र, भुसारी यांनी केलेल्या तक्रारीत जमिनीच्या इतर मालकांना समाविष्ट केले नव्हते. त्यामुळे केवळ भुसारी यांना सदनिकेचा ताबा दिल्यास इतर मालक त्यावर प्रश्‍न उपस्थित करू शकतात, असा युक्तिवाद बिल्डरचे वकील आर. बी. सोनी यांनी केला. तसेच, ही तक्रार रद्द करण्याची मागणीही केली होती. ती रेराने मान्य केली आहे.

मुलाचा जीव जाऊनही पालिकेत फक्त चर्चाच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint against builder rejected by Mahrera