कंगना राणावत च्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुण्यात तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना राणाव
कंगना राणावत विरुद्ध तक्रार दाखल

कंगना राणावत च्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुण्यात तक्रार दाखल

पुणे : अभिनेत्री कंगना रणावतने केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणजे बेकायदेशीर असामाजिक कृत्य असून तिच्या विरुद्ध बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत (यूएपीए) सह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

हेही वाचा: 'बुद्धाची मुर्ती फोडली म्हणूनच तालिबान...'; योगी आदित्यनाथांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केलेल्या या तक्रारीत कंगना रणावत हिचे वक्तव्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचे प्रकरण आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पोकनर यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत कंगना रणावत हिच्या सोबतच तिची मुलाखत घेणारे पत्रकार आणि संबंधित वृत्तवाहिनीवरही गुन्हा नोंदवावा, असे या तक्रारीत नमूद केले आहे.

कंगना राणावत हिने लेखी माफी मागावी; अन्यथा तिच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे नवलाखा यांनी सांगितले. कंगना राणावत यांना दिलेला पद्म पुरस्कार परत घ्यावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वेगळे पत्र पाठविण्यात आले आहे. याबाबत न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथोरीटीकडे सुद्धा तक्रार करण्यात आल्याचे ॲड. सरोदे म्हणाले.

loading image
go to top