बांगलादेशींना पकडायला गेले अन् 'मनसे'वाले स्वत:च अडकले

complaint Filed against MNS Party Worker
complaint Filed against MNS Party Worker

पुणे : भारतीय असूनही बांगलादेशी नागरिक ठरवित बेकायदा घरात घुसून मानसिक त्रास देत बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध त्यापैकी एका नागरिकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याद्वारे संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी धनकवडीमधील तिघांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून पोलिसांना चौकशी करण्यास भाग पाडले होते. दिलशाद मन्सुरी, रोशन शेख व बप्पी सरदार या तिघांनी आपण भारतीयच आहोत, असे सांगूनही सहकारनगर पोलिसांनीही कार्यकर्त्यांवर विश्‍वास ठेवून तिघांना पोलिस ठाण्यात आणून दिवसभर त्यांची चौकशी केली. ते भारतीय असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना सायंकाळी सोडून दिले. याप्रकरणी रविवारी रोशन शेख याने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली.

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?
 

दरम्यान, ''मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मी मनसेचा 2009-10 या वर्षी सदस्य होतो, असे असतानाही मनसे कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलिसांनी शनिवारी माझ्या घरात घुसून पत्नी, मुले व शेजाऱ्यांसमोर आपल्याला पोलिस ठाण्यात आणले. त्यांना भारतीयत्वाची सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांनी दिवसभर पोलिस ठाण्यात चौकशी केली. या प्रकारामुळे मला मानसिक व शारीरिक त्रास झाला. तसेच रोजचे जीवन जगणे कठीण झाले आहे, त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा,'' अशी मागणी रोशन शेख याने केली आहे. 

पुणेकर ओढतात रोज सात सिगारेटचे झुरके ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com