एमआयटी विरोधात अजित पवारांकडे तक्रार

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असताना काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
एमआयटी विरोधात अजित पवारांकडे तक्रार
Summary

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असताना काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

पुणे : कोरोनाचा काळ असूनही एमआयटी वर्ल्ड पीस युनीव्हर्सिटीने बीटेकच्या विद्यार्थ्यांचे परदेश अभ्यास दौऱ्याचे पैसे परत करत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. हे पैसे विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी केली आहे. (complaint to deputy chief minister ajit Pawar against mit)

बीटेकच्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षांत परदेशातील कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळावा, यासाठी एमआयटी संस्थेने परदेश दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले आहेत. पण, कोरोनामुळे सहल जाऊ शकत नसल्याने तीन वर्षांपासून घेतलेले पैसे चौथ्या वर्षाचे शुल्क म्हणून गृहीत धरावेत किंवा ज्यांनी शुल्क भरले आहे, त्यांनी सहलीचे पैसे परत करावेत अशी मागणी संस्थेकडे केली आहे. पण, त्यास एमआयटी संस्थेने नकार दिला आहे.

एमआयटी विरोधात अजित पवारांकडे तक्रार
उद्योगांना थोड्या प्रमाणात तरी ऑक्सिजन द्या : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार पुण्यात असताना काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन पैसे न भरलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याची तक्रार केली आहे, असे पालक प्रतिनिधी मोहन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, एमआयटीचे कुलगुरू एन. टी. राव यांनी विद्यापीठाद्वारे पालक व विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे, त्यामध्ये त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला आहे. सहलीचे पैसे हा शुल्काचाच भाग आहे. शिक्षण संपले, तरी पुढील तीन वर्षांत विद्यार्थ्यांना परदेश सहल करा येईल, असे नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com