खेड तालुक्याच्या आढावा बैठकीत झेडपीचे उपाध्यक्ष संतापले...

राजेंद्र सांडभोर
बुधवार, 1 जुलै 2020

 खेड तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीच्या पंचनाम्यांत शेतबांधावरची झाडे आणि विहिरींच्या नुकसानीचे पंचनामेच केले नसल्याचे समोर आल्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्याक्ष रणजित शिवतारे यांनी..

राजगुरूनगर (पुणे) : जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या खेडच्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस पडल्याने पदाधिकार्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले व काही अधिकाऱ्यांना नोटीसही काढल्या.

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा...

खेड तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीच्या पंचनाम्यांत शेतबांधावरची झाडे आणि विहिरींच्या नुकसानीचे पंचनामेच केले नसल्याचे समोर आल्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्याक्ष रणजित शिवतारे यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. 

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

जिल्हा परिषदेच्या वतीने उपाध्यक्ष शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली खेड पंचायत समितीच्या सभागृहात खरीप हंगाम, कोरोना साथ आणि विकास कामांची आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, बाबाजी काळे, अतुल देशमुख,  तनुजा घनवट,  अमोल पवार आदी उपस्थित होते.

बारामतीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री

खेड तालुक्यात काही ठिकाणी बी- बियाणे आणि खतांची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींची कृषी खाते दखल घेत नाही. तसेच सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींबाबत पाहणी होत नसल्याच्या तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या.  

हवेलीतील रुग्णांची संख्या पोहचली...

कोरोनाबाबतच्या सर्वेक्षणासाठी आणि उपाययोजनांसाठी, राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी नगरपरिषदांनी स्वतःची वैद्यकीय यंत्रणा नेमावी. मोठ्या उत्पन्न गटातील ग्रामपंचायतींनी स्वतः अँम्बुलन्स खरेदी करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकाऱय़ांची बैठकीला दांडी                       चक्रीवादळात वीज वितरण कंपनीच्या नुकसान झालेल्या कामांचा आढावा देण्यासाठी चाकण विभागातील अधिकारीच बैठकीला उपस्थित नव्हता. तर, शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षण योजनेअंतर्गत आलेल्या शाळानिहाय निधीची माहिती सदस्यांना दिली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्याचा सक्षम उद्भव नसतानाही नळ पाणी पुरवठा योजनांची कामे केली जातात. त्यामुळे या योजना पाण्याअभावी बंद पडतात, अशीही तक्रार बैठकीत करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints from citizens in Khed taluka review meeting