कलाश्री संगीत मंडळाचा गुरूपुजन सोहळा संपन्न

रमेश मोरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळाचा संगीतमय गुरूपुजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.पं. भिमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे पार पडलेल्या गुरूपुजन सोहळ्यात स्व.शकुंतला नारायण ढोरे स्मृती  प्रतिष्ठाण व कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेल सांगितिक गायन, वादनाने सोहळा संपन्न केला. कार्यक्रमाची सुरूवात नगरसेविका माई ढोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पं.सुनिल देशपांडे, पं.सुधाकर चव्हाण व रघुनाथ राऊत उपस्थित होते.

प्रथम सत्रात नंदकिशोर ढोरे व त्यांचे शिष्य सुमित खुडे,विष्णू गलांडे, प्रसाद भारथी, अभिजीत शेजवळ, आदित्य पवार, स्मितीश कुर्वे, अनीष सुळे व अनिकेत सुतार यांनी बहारदार तबला जुगलबंदी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या उठाण, पेशकार, दर्जेदार परन, चलन, तीस्त्र आणी चतुरस्त्र जातीचे कायदे, घराणेदार गती, बुजुर्ग कलाकारांनी रचलेले चक्रादार, आमद, गती, तोडे सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. रसिकांना गुरुशिष्यांची जुगलबंदी पहायला मिळाली.त्यांना हार्मोनियमसाठी साथसंगत गंगाधर शिंदे तर टाळासाठी जान्हवी ढोरे यांनी साथ संगत केली. 

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात पं.सुधाकरजी चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी विलंबित एकतालात "गोरख कल्याण" रागातील   "गोरे गोरे मुखपर" हा बडा ख्याल तर मध्य तीनतालात  "जोगन बने तुम्हरे तरस बिन" हा छोटख्याला मधून भक्ती आणी श्रंगार रसाचा अविर्भाव सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायनाच्या शेवटी "माझा भाव तुझे चरणी" हा पं.भिमसेन जोशी यांचा अजरामर अभंग अतिशय भक्तीरसपूर्ण वातावरणात सादर करून उत्सवात रंगत वाढविली. त्यांना तबल्यासाठी पं. सुनिलजी देशपांडे, हार्मोनियमसाठी पं. प्रभाकरजी पांडव, पखवाजसाठी गंभीर महाराज, टाळासाठी दिगंबर शेडूळे, तानपुऱ्यासाठी संदीप गुरव, नामदेव शिंदे व  दशरथ चव्हाण यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सोलो तबला वादन झाले. त्यांनी कायदे, रेला व तुकडे सादर केले. त्यामध्ये शाश्वती चव्हाण व  त्यांच्या शिष्यांनी मराठी चित्रपटामधील विविध प्रार्थनागीते सादर केली.

गुरूपुजन सोहळ्यासाठी अंजली पवार, सुजाता तरस, पं धनंजय वसवे, चंद्रकांत शेलार, मोरेश्वर ढोरे व संतोष ढोरे, कैलास जाधव, आदी या मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पांडव यांनी तर आभार  प्रणव जाधव यांनी मानले.फोटो ओळ- जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळाच्या गुरूपुजन सोहळ्यात तबला जुगलबंदी सादर करताना कलाश्री संगीत मंडळाचे विद्यार्थी.

Web Title: Completed Gurupujan program of Kalaashree Music mandal