ओंकारचे बदलायचे एकाच वेळी हृदय आणि फुफ्फुस...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अभियंत्याच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

निमगाव केतकी (पुणे): पानशेत (ता. वेल्हे) येथील संगणक अभियंता ओंकार गणेश पोरे या 24 वर्षीय युवकाचे निकामी झालेले हृदय आणि फुफ्फुस एकाच वेळी बदलायचे आहे. त्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च 35 लाख रुपये येणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी चार महिन्यांत तेरा लाख जमा केले आहेत. ओंकारवर चेन्नईत उपचार सुरू असून, आणखी 22 लाख रुपये जमल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. ओंकारसाठी दानशूरांनी मदतीचे हात पुढे करावेत, असे आवाहन त्याच्या पालकाने केले आहे.

ओंकारची आई सुजाता म्हणाल्या, ओंकारच्या हृदयाला लहानपासून छिद्र होते. त्या वेळी डॉक्‍टरांनी सांगितले होते तो जसा मोठा होईल, तसे ते कमी होऊन पूर्ण बंद होईल. मात्र, ते वाढत गेल्याने हृदय आणि फुफ्फुसही निकामी झाले. या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी कराव्या लागत आहेत. चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ती करण्यात येणार आहे. त्यास सुमारे 35 लाख रुपये खर्च येणार आहे. नातेवाइकांनी मदत केली असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख मिळाले आहेत. अनेक ट्रस्टला भेटलो; परंतु ते राज्याबाहेर मदत देऊ शकत नाहीत. आमच्या परिस्थितीमुळे आम्ही एवढा खर्च करू शकत नाही, त्यामुळे समाजातील दानशूरांनी ओंकारच्या जिवासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.

मदतीसाठी संपर्क ः
ओंकार गणेश पोरे, 9834 76 8998,
बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा पानशेत, खाते क्रमांक - 68007183026.
ifsc code mahb0000912.

Web Title: computer engineer omkar pore operation need money