संगणक अभियंत्याची वालचंदनगरमध्ये आत्महत्या | Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Sangar
संगणक अभियंत्याची वालचंदनगरमध्ये आत्महत्या

संगणक अभियंत्याची वालचंदनगरमध्ये आत्महत्या

वालचंदनगर - पुण्यातील आयटी कंपनीने कामावरती हजर झाले नसल्याचा कारणे दाखवाचा मेसेज केल्यानंतर नोकरी जाण्याच्या भितीने वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील संगणक अभियंत्याने तळ्याळ्यातील पाण्यामध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

अभिषेक प्रभाकर सनगर ( वय २४, रा . पोस्ट कॉलनी, वालचंदनगर) या युवकाने आत्महत्या केली . याप्रकरणी प्रभाकर शंकर सनगर ( वय ५१ रा . पोस्ट कॉलनी वालचंदनगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिषेक सनगर हा पुण्यातील नामवंत आय.टी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. कोरोना मुळे अभिषेक गेल्या सुमारे २० महिन्यापासून घरुन कंपनीचे वर्क फॉर्म होम अंतर्गत काम करीत होता. गेल्या दोन महिन्यापासुन संबधित कंपनीचे नियमित कामकाज सुरु झाले होते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १७७ नवे कोरोना रुग्ण

मात्र, अभिषेक हा कामावर हजर झाला नसल्याने कंपनीने कंपनीमध्ये हजेरी का लावत नाही ? असे कारणे दाखवा बाबत मॅसेज केला होता.मेसेज आल्यानंतर घरातील नागरिकांनी समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अभिषेक आज मंगळवार (ता. १४) रोजी सकाळी ११ च्या सुमारास अचनाक घरातुन निघुन गेला. वालचंदनगरमधील तळ्यातील पाण्यामध्ये त्याने उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मयत दाखल केले असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बनसोडे करीत आहेत.

Web Title: Computer Engineer Suicide In Walchandnagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :computer engineer