संगणक अभियंत्यांकडून वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की

court
court

कोंढवा (पुणे) : दुचाकीवरून ट्रिपल सीट वाहन चालणाऱ्या संगणक अभियंत्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली. पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कोंढवा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडली होती.

ऍनावर इरफान मंडल (वय 26), राफिऊर इरफान मंडल (वय 21), रूपम जियाउन मंडल (वय 21), आएशा ऍनावर मंडल (वय 23 सर्व रा. डिस्ट्रीक सोसायटी, येवलेवाडी, मूळ गाव रा. पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्या संगणक अभियंत्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा वाहतूक पोलिस हवालदार अलका राजेंद्र कांबळे यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिस हवालदार अलका कांबळे, प्रशांत पिलनकर, सहायक पोलिस फौजदार जाधव, सोनवणे हे कोंढवा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर कर्तव्य बजावत असताना आरोपी पल्सर गाडीवरून (क्र. एमएच 04 जीएस 9640) ट्रिपल सीट जात होते. त्या वेळी फौजदार अलका कांबळे यांनी त्यांना थांबवून गाडीची कागदपत्रे आणि वाहन परवाना मागितला. आरोपींनी गाडीची कागदपत्रे न देता पोलिसांवर अरेरावीस सुरवात केली. तुम्हाला कागदपत्रे आणि वाहतूक परवाना मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगत पोलिसांकडे ओळखपत्राची मागणी केली. मोबाईलवरून शूटिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यादरम्यान आरोपींनी आएशा मंडल हिला तेथे बोलावून घेतले. आएशाने पोलिसांबरोबर वाद घालून धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी आरोपींनी अटक करून कोंढवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोखंडे यांनी आरोपींकडे चौकशी केली. ते चौघेही संगणक अभियंता असून कॅम्प परिसरात स्मार्टस बीपीओ कॉल सेंटर चालवत असल्याचे समजले. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करीत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com