esakal | बारामतीत वाहतूक आराखड्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत वाहतूक आराखड्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

शहरातील सिनेमा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी कोणतीच वाहने पार्किंग करता येणार नाहीत.

बारामतीत वाहतूक आराखड्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : शहरातील सिनेमा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी कोणतीच वाहने पार्किंग करता येणार नाहीत, पार्किंग केल्यास कारवाई करु, असा पवित्रा बारामती वाहतूक पोलिसांनी घेतल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बारामतीच्या वाहतूक आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच मंजूरी दिली. त्यात मंडई वाहनतळावर सिनेमा रस्त्यावरील वाहनांचे पार्किंग केले जाईल, असे नमूद केलेले आहे. त्या मुद्यानुसार वाहतूक पोलिसांनी आजपासून व्यापाऱ्यांचे प्रबोधन करण्यास प्रारंभ केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तीन हत्ती चौक ते भिगवण चौक व भिगवणचौकापासून ते इंदापूर चौकापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचे ना दुकानदारांना ना ग्राहकांना पार्किंगच करता येणार नाही, अशी भूमिका पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घेतली. त्यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, शैलेश साळुंके, दीपक मुथा, नीलेश भुते, नीलेश कोठारी, नरेंद्र मोता यांनी गोडसे यांच्याशी चर्चा केली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटीलही व्यापा-यांच्या भावना विचारात घेत सिनेमा रस्त्यावर पोहोचले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव व विरोधी पक्षनेते सुनील सस्तेही घटनास्थळी आले. पोलिसांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच आम्ही कारवाई करत असल्याचे सांगितले. सुशील सोमाणी, नरेंद्र गुजराथी यांनी जिल्हाधिका-यांनी जो आदेश दिलेला आहे, त्यात नो पार्किंग रकान्यात सिनेमा रस्त्याचा उल्लेखच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, धन्यकुमार गोडसे हे मंडई वाहनतळाच्या ठिकाणी जी वाहने लावणे अपेक्षित आहे, त्या रकान्यात सिनेमा रस्त्याचा उल्लेख असल्याचे सांगत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अखेर सोमवारी या प्रश्नासंदर्भात प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस व व्यापारी अशी बैठक आयोजित करण्याची ग्वाही सचिन सातव यांनी दिली. या संदर्भात चर्चा करुन मार्ग काढू, प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलू, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही सातव यांनी दिली. दरम्यान संपूर्ण रस्त्यावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगला मनाई केल्यास आक्षेप नाही मात्र किमान दुचाकी पार्किंगला परवानगी द्यावी, अशी व्यापा-यांची भूमिका आहे.

या संदर्भात अन्यायकारक भूमिका घेतल्यास प्रसंगी बारामती बंदचा निर्णय घेतला जाईल, अशी संतप्त भूमिका काही व्यापा-यांनी बोलून दाखवली.

...तर रस्त्यावर येऊ

लॉकडाऊनने अगोदरच व्यापारी कंगाल झाला आहे, अशा स्थितीत वाहतूक आराखड्याने ग्राहकांची गैरसोय झाल्यास त्याचा व्यापाऱ्यावर विपरीत परिणाम होईल व अनेक व्यापारी रस्त्यावर येतील, अशी भीती काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.