मांजरी पूलावरील काँक्रीट उखडले

कृष्णकांत कोबल
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मांजरी : सलग तीन दिवस पुलावरून पाणी वाहिल्याने येथील मुळा-मुठा नदी पुलावरील सुमारे एक फुट खोलीचा काँक्रीटचा थर उखडला आहे. पुलावरील वेगवेगळ्या केबल्स आणि पाईप उघडे पडले आहेत. त्यामुळे पूलावरील पाणी ओसरूनही वाहतूकीचा धोका कायम आहे.

या पूलावरून मागील तीन दिवस पुराचे पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे मांजरी बुद्रुक गावाच्या बाजुने पुलावरील काँक्रीटचा थर उखडून वाहून गेला आहे. संपूर्ण पुलावर ठिकठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. उघड्या पडलेल्या केबल्स व पाईपमध्ये मोठ्याप्रमाणात कचरा अडकला आहे. गाळही साचला आहे. त्यामुळे येथील वाहतूक सध्या बंद आहे. मात्र अनेक दुचाकीस्वार धोकादायक पध्दतीने येथून प्रवास करीत आहेत. 

या भागातील शाळा आज सुरू झालेल्या आहेत. मात्र रस्ता आणि पुलाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंढवामार्गे प्रवास करावा लागला आहे. पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पूलाची आणि रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: concrete over the manjri bridge uprooted