काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पिंपरी - स्थायी समितीने मंजूर केलेल्या सुमारे २६५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावांमध्ये गोलमाल असल्याचे समोर आले आहे.

सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने हातात हात घालून शहराचा समतोल विकास करण्याचे सोडून सुस्थितीत असलेले रस्तेच पुन्हा खोदून त्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा घाट घातला आहे. इंद्रायणीनगरमधील तीन वेगवेगळे अद्ययावत आणि सुस्थितीत असलेले रस्ते खोदून ते सिमेंटचे करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.  

महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील विविध कामांसाठी तब्बल २६५ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंगळवारी (ता. १९) मंजुरी दिली. हे सर्व प्रस्ताव बुधवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत ऐनवेळी दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता या प्रस्तावांना शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाणार आहे. 

इंद्रायणीनगरमधील इंद्रायणी चौक ते संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल ते तिरुपती चौक (३० कोटी), संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्सपर्यंत (३० कोटी) आणि तिरुपती चौक ते विश्‍वेश्‍वर चौक (४० कोटी) हे रस्ते अद्ययावत करण्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या हे तीनही रस्ते सुस्थितीत आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरणही झाले असून, पदपथही चांगल्या स्थितीत आहेत. 

शहरातील समाविष्ट गावांमध्ये आणि गावठाण परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. समाविष्ट गावांमध्ये नियोजनपूर्वक विकास होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विकासापासून वंचित असलेल्या भागातील रस्ते, पदपथ, सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्या, इतर भौतिक व सार्वजनिक सुविधा, तसेच आरक्षणांचा विकास करण्याऐवजी विकास झालेल्या भागातच पुन्हा रस्ते खोदून त्यावर कोट्यवधींचा खर्च करण्याचा घाट घातला आहे.

Web Title: concrite road proposal standing committee