तुम्हीच सांगा, तळेगाव ढमढेरे- जेजुरी रस्त्याने कसं जायचं....!

नागनाथ शिंगाडे
Thursday, 6 August 2020

खोदलेल्या रस्त्यात चिखल व पाणी साठल्याने अक्षरशः वाहने खचत आहेत, तर घसरगुंडीने वाहन चालक, शेतकरी, कामगार, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. 

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे- जेजुरी या महत्वाकांक्षी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पासून पिंपरी सांडस पुलापर्यंतचा रास्ता ठेकेदाराने मोठी वाहने आणून खोदून घेतला. एका बाजूला पूर्वीचा जुना ओबड धोबड रस्ता व दुसऱ्या बाजूला नव्याने वाढीव खोदलेला रास्ता वर्षभरापासून जैसे थे अवस्थेत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्याच्या अर्धवट कामाची पाहणी आमदार अशोक पवार, बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांनी केली होती. तातडीने अर्धवट रस्त्याचे काम सुरु करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी अधिकारी व ठेकेदाराला दिली होती. त्यानुसार काही काळ रस्त्याचे कामही सुरु झाले. परंतु, कोरोना महामारीच्या काळापासून या रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब आहे. खोदलेल्या रस्त्यात चिखल व पाणी साठल्याने अक्षरशः वाहने खचत आहेत, तर घसरगुंडीने वाहन चालक, शेतकरी, कामगार, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

विठ्ठलवाडी येथील बंधाऱ्यावरील पूल शासनाने वाहतुकीस बंद केल्याने सर्व जड वाहने तळेगाव ढमढेरे- जेजुरी या रस्त्याने जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ व वाहन चालक मात्र 
वैतागले आहेत. अर्धवट रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा,  ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नवनाथ ढमढेरे व ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे. 

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र

दरम्यान, ''या रत्यासंदर्भात आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आजच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची पाहणी करण्यासाठी पाठवणार असून,  पावसाळ्यातील तातडीची दुरुस्ती करून, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना अधिकारी व ठेकेदाराला सांगण्यात येईल."

"बांधकाम विभागाचे अधिकारी मिलिंद बारभाई म्हणाले की, ''आमदार अशोक पवार यांच्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदाराला कळवून रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची व्यवस्था करण्यात येईल."

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conditions of Talegaon Dhamdhere Jejuri road is worse