शहरातील मिळकतकर थकबाकीदारांवर जप्ती

Property-tax
Property-tax

पिंपरी - शहरातील ऐंशी हजार मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेच्या कर संकलन विभागाने नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास एक एप्रिलपासून जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 

करसंकलन विभागाने मिळकतकर थकबाकीला जबाबदार धरून तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यात शास्ती व मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून, त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. मिळकतकर वसुलीच्या कामात निष्काळजीपणा व कर्तव्य बजावण्यात हयगय केल्याने प्रत्येकावर एक वेतनवाढ स्थगित व २५० रुपये दंडाची कारवाई केली होती. त्याबाबतची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. चालू आर्थिक वर्षाचे मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ८० हजार मिळकतधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. ही नोटीस जप्ती पूर्व आहे. सात दिवसांत मिळकतकर भरायचा आहे. कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

शास्तीमुळे थकबाकीत वाढ?
अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतधारकांवर शास्ती आकारला आहे. मोकळे भूखंड व निवासी मिळकतींच्या कराचीही वसुली होत नसल्याचे आढळले आहे. मिश्र वापर, बिगर निवासी व औद्योगिक वापर यांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई अत्यल्प असल्यामुळेही थकबाकी वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्चपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.
- डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com