रिलायन्स इन्फ्रा आणि पेट्रोलिंग पथकाच्या वादात प्रवाशांचे हाल

khadde
khadde

खेड-शिवापूर : पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या खड्डयांमुळे अपघात होत असल्याने हे खड्डे जीवघेणे झाले आहेत. या परिस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असून रिलायन्स इन्फ्रा खड्डे बुजविण्याची जबाबदारी पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरक्ष चाळण झाली आहे. या खड्डयात दुचाकी वाहने आदळून अपघात होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे.

शनिवारी रात्री जांभुळवाडी दरी पुलावर पडलेल्या एका खड्डयामुळे सुमारे पाच चार चाकी वाहनांचे टायर फुटले. खेड-शिवापूर येथे हॉटेल चंद्रमयसमोरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्डयात दुचाकी वाहने आदळून सुमारे दहा अपघात झाले आहेत. शनिवारी रात्री या खड्डयात दुचाकी घसरुन एक जोडपे गंभीर जखमी झाले आहे. टोलनाका परीसरात तसेच वरवे आणि शिवरे येथील सेवा रस्त्यावर खड्डयांची चाळण झाली आहे. 

रस्त्यावर पडलेल्या या खड्डयांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स इन्फ्राने हे खड्डे ताबडतोब बुजविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून रिलायन्स इन्फ्राचे या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा रस्त्यावर पडलेले हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे. तर आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढया उपाययोजना आम्ही करत आहोत. मात्र हे खड्डे बुजविण्याची खरी जबाबदारी रिलायन्स इन्फ्राच्या बांधकाम विभागाची असल्याचे पेट्रोलिंग पथकाचे म्हणणे आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि पेट्रोलिंग पथकाच्या या वादात प्रवाशांचे हाल होत आहेत.

सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता या दोन्ही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुळात रिलायन्स इन्फ्राने अतिशय निकृष्ट पद्धतीचे डांबरीकरण केल्याने रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com