Corona Virus : सीबीएसई शाळांच्या परीक्षेबाबत संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाचा संसर्ग राज्यभरात वाढत आहे. राज्य शिक्षण मंडळाने पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द केले आहेत. मात्र, सीडीएस सीबीएसई बोर्डाच्या शाळांना  परीक्षा रद्द करण्याबाबत कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या मंडळाच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे, ॲप द्वारे परीक्षा एप्रिलमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे : मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त विद्यार्थी आढळल्याने पालक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे सीबीएसई मंडळाशी संलग्न शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्यात. त्यांना संदेशाद्वारे परीक्षेची तयारी करण्याची सक्ती करु नये अशी मागणी आता होऊ लागली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग राज्यभरात वाढत आहे. राज्य शिक्षण मंडळाने पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द केले आहेत. मात्र, सीडीएस सीबीएसई बोर्डाच्या शाळांना  परीक्षा रद्द करण्याबाबत कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या मंडळाच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे, ॲप द्वारे परीक्षा एप्रिलमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शासन अजूनही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे सांगत असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार का की राज्य सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करून या परीक्षा रद्द करणार, याविषयी पालक विचारणा करू लागले आहेत.

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची आजाराची लागण झाल्याची बातमी माध्यमातून प्रसारित झाली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये आणखी धास्ती वाढली आहे. पण शाळा मात्र अजूनही विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये परीक्षेची सक्ती करत असल्याची तक्रार पालक संघटना करीत आहेत. आता या परीक्षेला पालक त्यांच्या पाल्यांना पाठवणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. 

इंडिया वाईड पॅरेण्ट असोसिएशनच्या अध्यक्ष अनुभव सहाय यांनी, राज्य शिक्षण मंडळ याप्रमाणे सर्व बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे. कोणतीही शाळा एप्रिलमध्ये परीक्षेची सक्ती करणार असेल, तर त्याबाबत पालकांनी तक्रार करावी. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठविण्यात येणार आहे. सरकारनेही राज्य मंडळ व्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या शाळांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about CBSE schools exams continued due to Corona Virus