परवानगी तर मिळाली पण, पुणेकर येणार का? हॉटेल चालक चिंतेत

सनील गाडेकर
Thursday, 1 October 2020

सोमवारपासून (ता.5) राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र महापालिकेने अद्याप याबाबत नियमावली जाहीर केलेली नाही.

पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र हॉटेलसाठी कर्मचारी आणि इतर सर्व व्यवस्थापन उभे करणे आता सोपे नाही. एवढे करून व्यवसाय सुरू केला तरी ग्राहक येतील याची शाश्‍वती नाही. मुळात 50 टक्के क्षमतेने कामकाज करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही. त्यात पुण्यातील कोरोनाची स्थिती भीतीदायक आहे. मी हॉटेल सुरू करणार आहे. मात्र ते व्यवस्थित चालेल की नाही याची भीती मनात असल्याची भावना हॉटेल व्यावसायिक पुरुजीत पोळ यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारपासून (ता.5) राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र महापालिकेने अद्याप याबाबत नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शहरातील आठ हजार हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष आहे. कोरोनामुळे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याबाबत नागरिकांची मानसिकता पूर्णतः बदलली आहे. कोरोनाचा आकडा वाढला तर लोक पार्सल देखील मागवीत नाहीत. त्यामुळे खवय्ये किती प्रमाणात हॉटेलमध्ये येऊन जेवण करील, त्यातून आपला खर्च भागेल का? आहे त्या कर्मचा-यांना पगार देता येईल का? थकलेले भाडे आणि वीज बिलाची तरतूद कशी करायची? जागामालक पुन्हा जागा भाड्याने देणार का? असे अनेक प्रश्‍न सध्या हॉटेल व्यवसायिकांकपुढे आहेत.

शेजारच्याचे बघू काय होतेय?
शहरातील अनेक ठिकाणी अगदी दोनच्या फुटाच्या अंतरावर हॉटेल आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यावसायिकाला हॉटेल सुरू करुदेत. महिनाभर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय त्यावर आपण निर्णय घेऊ. नाहीतर काही दिवस नुसते पार्सल सुरू करू करू मग त्यावर पुढील निर्णय घेऊ असे, असे काही व्यावसायिकांनी ठरवले आहे.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

आयटी परिसरातील स्थिती जैसे थे? 
हिंजवडी, औंध, बाणेर, खराडी, मगरपट्टा अशा भागात आयटी क्षेत्रातील नोकरदारांवर अवलंबून असलेले अनेक रेस्टॉरंट व बार आहेत. मात्र यातील सुमारे 80 टक्के आयटीयन्स सध्या घरूनच काम करीत आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल सुरू करण्याबाबत व्यावसायिकांत मोठा संभ्रम असल्याने तेथील परिस्थिती जैसे थे राहण्याची शक्‍यता आहे.

या आहेत प्रमुख समस्या 
- कामगारांची उपलब्धता
- कोरोना नियमावलीनुसार व्यवस्थापनात बदल
- पुरेशा प्रमाणात ग्राहक येतील याची खात्री नाही
- आवश्‍यक उलाढाल झाली नाही तर खर्च कसा भागवायचा
- हॉटेल पुन्हा बंद करण्याबाबत आदेश निघण्याची भीती
- डिलिव्हरी बॉईजच्या आंदोलनाचा फटका
- थकलेले भाडे, पगार, लाइट बिल कसे भरणार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''महापालिकेच्या नियमावलीनुसार आम्ही हॉटेल सुरू करणार आहोत. कामगार आणि ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. लॉकडाऊन काळात या व्यवसायाची घडी पूर्ण विस्कटली आहे. त्यामुळे किती व्यावसायिक हॉटेल सुरू करतील हे पाच तारखेनंतर समजले. तर काही लोक परिस्थितीचा अंदाज घेऊन पुन्हा श्रीगणेशा करतील.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion among owner about starting a hotel