तहसीलदारांनी एक शब्द गाळला आणि संपूर्ण गावच हादरला... 

corona1
corona1

माळशिरस (पुणे) : कोरोनाबाधितांची आकडेवारी सांगताना पुरंदर तालुक्याच्या तहसीलदरा रुपाली सरनौबत यांनी माळशिरस आरोग्य केंद्राची आकडेवारी सांगताना फक्त गावाचा उल्लेख केला. त्यामुळे माळशिरस ग्रामस्थ आकडेवारी पाहून घाबरले. मात्र, त्यानंतर विचारणा केल्यावर त्यांनी माहिती आरोग्य केंद्राची असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांना धीर आला व त्यांचा जीव भांड्यात पडला.

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे मंगळवारी (ता. 14) कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर माळशिरस ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरले होते. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील इतर हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा अहवाल काय येतो, याची संपूर्ण माळशिरस व परिसरातील नागरिकांना उत्सुकता लागली होती. त्यात आज तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी प्रशासनाच्या वतीने अधिकृत माहिती जाहीर करताना माळशिरस येथे पाच रुग्ण सापडले, असे जाहीर केले. त्यामुळे माळशिरस ग्रामस्थ व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हादरले. मात्र, त्यानंतर त्यांनी माळशिरस गावात नसून, प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच रुग्ण सापडल्याची जाहीर केले. त्यामुळे माळशिरसकरांचा जीव भांड्यात पडून त्यांना धीर आला. 

पुरंदर तालुक्यात कोरणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना तालुक्यातील पूर्व भागातील मोठे गाव असणाऱ्या माळशिरस गावात एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, परवा रूग्ण सापडल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या रुग्णाच्या संपर्कातील आठ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल कसे येतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आज सर्व ग्रामस्थ या अहवालाची प्रतीक्षा करत असताना प्रशासन व पत्रकार यांच्या ग्रुपवर तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी तालुक्यातील एकूण आजच्या परिस्थितीचा आढावा  व माहिती देताना माळशिरस येथे पाच रुग्ण सापडल्याचे त्यामध्ये म्हटले होते. 

ही माहिती संपूर्ण माळशिरस गाव व परिसरात पसरल्यानंतर सर्व नागरिकांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, याबाबत पत्रकारांनी माळशिरस गाव की माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण रुग्ण संख्या आपण दिली आहेत, असे विचारल्यानंतर त्यांनी माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात पाच रुग्ण सापडल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे माळशिरसकरांना धीर आला व त्यांचा जीव भांड्यात पडला.
  
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com