महावितरणच्या वीजजोड शुल्कावरून झालेला गोंधळ कायम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

स्लॅब आणि दर मार्च पूर्वीचेच
महावितरणने आयोगापुढे सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावात भूमिगत नवीन वीजजोडसाठी ०.५ किलोवॅटपर्यंत  ३ हजार १०० रूपये चार्जेस असून ते ३ हजार ६३० रूपये करावे, असे म्हंटले आहे. तर ०.५ ते ७.५ किलोवॅटपर्यंतचे शुल्क ७ हजार १५० वरून ८ हजार ३० पर्यंत वाढीस मान्यता द्यावी, असे म्हंटले आहे. यावरून मार्चपूर्वी महावितरणकडून हेच दर आणि हेच दोन स्लॅब असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे - नवीन वीजजोड देताना आकरण्यात येणाऱ्या सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस (वीजजोड) संदर्भात महावितरणच्या स्तरावरील गोंधळ अद्याप मिटण्यास तयार नाही. मार्चपूर्वी पाच किलोवॅटपर्यंत ३ हजार १०० रुपये, तर पाच ते दहा किलोमीटर पर्यंत ७ हजार १५० रुपये शुल्क आकारले जात असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र सात किलोवॅटपर्यंत वीजजोड देण्यासाठी ३ हजार १०० रुपयेच शुल्क आकारले गेले असल्याचे कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मार्चपूर्वी ७.५ किलोवॅट क्षमतेच्या सिंगल फेज भूमिगत नवीन वीजजोडणीसाठी ७ हजार १५० रुपये दर निश्‍चित केलेले असताना महावितरणकडून प्रत्यक्षात ३ हजार १०० रुपयांची आकारणी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर महावितरणने पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. 

'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; काय म्हणाले पाहा!

मार्चपूर्वी ५ किलोवॅट व ५ किलोवॅटपेक्षा अधिक अशा दोनच वर्गवारीतील सिंगल फेज वीजजोडणीसाठी आयोगाने दर निश्‍चित केले होते. १२ सप्टेंबर २०१८ मध्ये आयोगाने दिलेल्या आदेशावरून मुख्य अभियंता (वितरण), यांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे भूमिगत सिंगल फेजच्या नवीन वीजजोडणीसाठी ५ किलोवॅटपर्यंत ३ हजार १०० रुपये आणि ५ ते १० किलोवॅटपर्यंत ७ हजार १५० रुपये असे दर आकारणीचे निर्देश दिले होते.

बेशिस्तपणामुळे आली पुन्हा लाॅकडाऊनची वेळ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

त्यामुळे पुणे परिमंडळात मार्चपर्यंत भूमिगत सिंगल फेजच्या ५ किलोवॅटपर्यंतच्या नवीन वीजजोडणीसाठी ३१०० रुपये दर आकारण्यात आला आहेत. आयोग आणि महावितरणच्या परिपत्रकाप्रमाणे दर आकारणी करण्यात आल्याने कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही,असा दावा महावितरकडून पत्रकात करण्यात आला आहे.

नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध? जाणून घ्या त्याच संदर्भात...​

प्रत्यक्षात मात्र सकाळच्या हाती आलेल्या कागदपत्रानुसार महावितरणकडून ७ किलोवॅट वीजजोड देण्यासाठी ३ हजार १०० रुपये या प्रमाणेच सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस आकारण्यात आले असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर दोन किलोवॅटपर्यंत वीजजोड देण्यासाठी ३ हजार १०० रुपये शुल्क आकारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ३ हजार रुपयेच सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस आकारण्यात आले असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परिपत्रकातील दर एक आणि आकारणी मात्र दुसऱ्याच दराने होत असल्याचे पुन्हा एकदा महावितरणने केलेला खुलासा व प्रत्यक्षात हात असलेली शुल्काची आकरणी यावरून समोर आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion over MSEDCLs electricity connection charges persists