बेशिस्तपणामुळे आली पुन्हा लाॅकडाऊनची वेळ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात साखळी तोडणे आवश्यक असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी (ता.९) रात्री चर्चा केली होती.

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अद्यापही काही जणांना गांभीर्य आलेले नाही, मास्क घालत नाहीत, नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. यात कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी पुण्यातील 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे'ला (सारथी) भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

Breaking : विद्यार्थ्यांनो, आता 'अशा' होणार परीक्षा; 'यूजीसी'ने जाहीर केली नियमावली!​

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात साखळी तोडणे आवश्यक असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी (ता.९) रात्री चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा पुणे पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : तावडे आणि भावे यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज!

लाॅकडाऊन जाहीर केल्याने काही लोकांना त्रास होईल, पण रुग्ण संख्या वाढत असल्याने आणि पावसाळ्यात नवीन साथीचे रोग ही निर्माण होतात. त्यामुळे पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता लाॅकडाऊन केले म्हणजे पहिला लाॅकडाऊन फसला असे होत नाही. काही वेळेला परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात. अनेक देशांनी दुसऱ्या वेळी लाॅकडाऊन केले, तसेच ठाण्यातही लाॅकडाऊन केले आहे, असे पवार यांनी सांगितले. 

नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध? जाणून घ्या त्याच संदर्भात...​

महापालिकांना आर्थिक मदत
मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक यासह सर्वच महापालिकांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे, त्यांना मदत करावी लागणार आहे. तसेच लाॅकडाऊनच्या काळात सरकारने शेतकऱ्यांचे ८ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, असे पवार यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसात सामान भरून घ्या
"लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत, पण अनेकांच्या घरात वस्तू नसतील, त्यामुळे त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी भाजीपाला, इतर वस्तू भरून घ्याव्यात. कोरोनाला रोखण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक आहे, त्यामुळे हा पुन्हा लाॅकडाऊन करत आहोत," असे पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to indiscretion of Punekars tough decision has been taken to lock down again explained Deputy CM Ajit Pawar