बारामतीत उसळली गर्दी; असं का घडतंय?

बारामतीत उसळली गर्दी; असं का घडतंय?

बारामती : सोमवारपासून (ता. 7) बारामतीत जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. या कर्फ्यूमध्ये नागरिकांनी नेमके काय करावे व काय करु नये या बाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने आज गोंधळाचेच वातावरण होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगराध्यक्षांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर कोणत्या सेवा सुरु राहणार, कोणाला परवानगी असणार व कोणाला नसणार या बाबत नियमावली जाहिर करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात या बाबत रविवारी दुपारपर्यंत कोणतीही स्पष्टता नव्हती. 

एकीकडे एमआयडीसीतील कंपन्यांना कारखाने सुरु ठेवण्याची परवागनी दिलेली आहे, बारामतीतील बाजारपेठ मात्र  कडक बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. यातही अनेकांना अनेक प्रश्न आहेत, अनेकांच्या अडचणीही आहेत. या बाबत आदर्श नियमावली जाहिर करावी, अशी बारामतीकरांची मागणी आहे.

विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायला जायचे आहे, अनेकांना दवाखान्यांची कामे आहेत, काही वयोवृध्द नागरिकांकडे स्वयंपाकापासून ते इतर कामासाठी येणा-या महिलांनी काय करायचे आहे, सिलिंडर संपला तर काय करायचे या सारख्या अनेक प्रश्नांबाबत कोणाकडे नेमकी चौकशी करायची व या बाबतचा निर्णय कोण घेणार याचीच नागरिकांना माहिती नसल्याने कमालीच्या गोंधळाचे वातावरण शहरात आहे. 
आजच या बाबत प्रशासनाने एक आदर्श नियमावली जाहिर करावी, जेणेकरुन लोकांना मनस्ताप होणार नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. 

बारामतीत उसळली गर्दी...
सोमवारपासून जनता कर्फ्यू असल्याने पुढे किती दिवस बंद राहणार याची नेमकी माहिती नसल्याने आज शहरातील किराणा दुकानांसह इतरही दुकानात गर्दी उसळली होती. सोशल डिस्टन्सिंगचा आज अनेक ठिकाणी फज्जा उडाला. ग्राहकांची नोंदणी, तापमान घेणे, सॅनेटायझर्सचा वापर या बाबी दूरच गर्दी आवरताना दुकानदारांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

रस्त्यांबाबतही नेमकी स्पष्टता नाही-
शहरात रस्ते बंद केले जाणार का, कोणत्या रस्त्यांवर अडथळे उभे केले जाणार, पोलिस बळाचा वापर करणार का या पासून अनेक प्रश्न आज अनुत्तरितच होते. याची नेमकी स्पष्टता कोणीही करण्यास तयार नसल्याने शहरात गोंधळच होता. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com