कॉंग्रेसचे ठिकठिकाणी थाळीनाद' आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पुणे - नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन सरकारीदरबारी देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्याच्या वतीने करण्यात आली. 

नाशिकमध्ये सरकारविरोधी घोषणा 
नोटबंदीनंतर सामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या महिला आघाडी आणि सेवादलातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. नोटाबंदीमुळे "ना शेतमालाला भाव, ना लग्नाला पैसा... सरकारने सांगावे अब इंतजाम करे कैसा', "बॅंकबुडव्या मल्ल्या इंग्लंडमध्ये चैनीत, निरपराध जनता मात्र बॅंकेच्या लायनीत', "मोदी सरकार हाय हाय', "काळ्या पैशांतून शेतकरी कर्जमुक्ती करा' अशा घोषणा देण्यात आल्या. 

नांदेड, परभणीत आंदोलन 
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महिला कॉंग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले. परभणीतही शहरात जिल्हा कॉंग्रेस समितीने थाळीनाद आंदोलन केले, तर नोटाबंदीचा निषेध करून ठिकठीकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

पिंपरीत थाळीनाद करून घोषणाबाजी 
नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सरकारविरोधी घोषणांमुळे पिंपरी चौक दणाणून गेला. भाजप सरकार हाय हाय, हुकूमशाही सरकारचा निषेध असो, या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Web Title: congress agitation for currency ban oppose