Pune Bypoll Election
Pune Bypoll Election

Kasba Bypoll Election : बाळासाहेब दाभेकर उद्या अर्ज मागे घेतील ; काँग्रेसला विश्वास!

Kasba Bypoll Election :  कसब्यातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. दाभेकर यांनी बंडखोरी करत काल कसबा पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दाभेकर यांच्या बंडखोरीमुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होऊ शकते, याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे  दाभेकर यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. 

निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासोबत दाभेकर यांची बैठक झाली. बैठकीत थोपटे यांनी बाळासाहेब दाभेकर यांच्या मन धरणीचे प्रयत्न केले.  बाळासाहेब दाभेकर कार्यकर्त्यांशी बोलून घेणार निर्णय असल्याती माहिती मिळत आहे. 

बाळासाहेब दाभेकर यांनी कसबा पोट निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती.  दरम्यान उद्या पर्यंत बाळासाहेब दाभेकर अर्ज मागे घेतील असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. 

Pune Bypoll Election
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचं आम्ही भाजपमध्ये स्वागत करु; पण... मोठ्या नेत्याचं विधान
Pune Bypoll Election
आता 'या' सर्वात मोठ्या शहराचं नाव बदलणार? नामकरणासाठी ABVP, RSS आक्रमक

काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर पडदा -

भाजप पाठोपाठ काँग्रेस नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे.  माजी मंत्री रमेश बागवे व अविनाश बागवे हे दोघे नाराज होते. दरम्यान रमेश बागवे व अविनाश बागवे हे दोघेही कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. 

बागवे यांनी आज रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बाईक रॅली काढली. यावेळी धंगेकर यांनी बागवे यांचे जोरदार स्वागत केले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजय होईल असा विश्वास बागवे व धंगेकर यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत भाजप आणि मनसेतील कार्यकर्तेची साथ असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे

Pune Bypoll Election
Shiv Sena : मातोश्रीवरील चार डाकू उद्धव ठाकरेंना..; शिंदे गटातील मंत्र्यानं केलं मोठा गौप्यस्फोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com