मध्य पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा? कॉंग्रेसने केली ही मागणी

Congress demands increase in carpet area to relief to 10 lakh Pune residents
Congress demands increase in carpet area to relief to 10 lakh Pune residents

पुणे : पुण्यात वाड्यांत राहणाऱया दहा लाख पुणेकरांना दिलासा देण्यासाठी दोन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) द्यावा. केवळ सहा मीटर रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी टिडीआर देण्याएेवजी सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सहा मीटर व नऊ मीटर रस्त्यावर टिडीआर देण्याचा निर्णय रहिवाशांएेवजी बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी जास्त आहे. त्यामुळेंच महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तत्परता दाखविली आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 जून रोजी मुंबईत बैठक घेऊन तत्परता दाखविली आहे. परंतु, शहराच्या मध्यभागात पेठांमध्ये राहणाऱया सुमारे 10 लाख नागरिकांना दिलासा देण्यासाठी एफएसआय 2 देण्यात यावा, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. 
------------------
'या' सरकारने लावले १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेरे; समोर आला नवा वाद
-------------------
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
-------------------

शहराचा 2007 चा विकास आराखडा तयार करताना नजरचुकीने 2 एेवजी 1. 5 एफएसआयचा निर्णय झाल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे, ही शरमेची बाब आहे. त्याचा परिणाम मध्य पुण्यावर झाला आहे. त्यासाठी कॉंग्रेसने आंदोलने करून शहर सुधारणामार्फत 2 एफएसआय करून घेतला. परंतु, मार्च 2015 मध्ये विकास आराखडा ताब्यात घेताना भाजपच्या राज्य सरकारने हा एफएसआय पुन्हा 2 ठेवला आहे. तसेच जे रस्ते मुख्य रस्ते नाहीत, त्यावर 24 मीटर रुंदीची अट भाजप सरकारने ठेवली आहे. त्यामुळे मध्य पुण्याच्या विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. 

शहरात ज्या भागात अन्यायकारक रस्ता रुंदी भाजपने दाखविली आहे, ती रद्द करून मध्य भागातील वाड्यांना 2 एफएसआय द्यावा, अशी गेल्या सहा वर्षांपासून मागणी करीत आहोत. विकास आराखड्यातील अनेक आरक्षणे उठवून महापालिकेतील भाजपने शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे. ही चूक तातडीने दुरुस्त करून मध्य पुण्यातील मिळकतींना 2 एफएसआय देण्यात यावा, अशी मागणीही बालगुडे यांनी केली आहे. या बाबत आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com