लोकप्रिय चेहऱ्यांना काँग्रेसने संधी द्यावी - व्यंकटेश केसरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘काँग्रेस पक्षाला २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर पक्षाला संघटनात्मक बळकटी दिली, तर काँग्रेस हा भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय ठरू शकतो,’’ असे मत पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी व्यक्त केले. ‘२०१९ लोकसभा निवडणूक व काँग्रेस’ या विषयावर ते बोलत होते.

राजीव गांधी स्मारक समिती, पुणे व पुणे शहर-जिल्हा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न राजीव गांधी जयंती सप्ताहाअंतर्गत हिराबाग चौक येथील रंगदर्शन सभागृहात या कार्यक्रमाला पत्रकार अनंत बागाईतकर, काँग्रेस नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.

केसरी म्हणाले, ‘‘भाजप हा आर्थिक व सामाजिक प्रश्‍नांवर शांत आहे. काँग्रेसने या प्रश्‍नांबरोबर बेरोजगारी आणि शेतकरी मागण्या या मुद्याला महत्त्व दिले पाहिजे. भाजपचे जातीय राजकारण काँग्रेसने जनतेसमोर मांडले पाहिजे; तसेच पक्षाला संघटनात्मक पातळीवर मजबूत केले तर काँग्रेस येत्या निवडणुका जिंकू शकतो.’’

या वेळी संरक्षण मालमत्ता खरेदीविषयक मार्गदर्शन करताना अनंत बागाईतकर म्हणाले, ‘राफेल विमान खरेदीबाबत फ्रान्स सरकारने सुरक्षितता आणि कार्यात्मक गोपनीयता याबातचे तपशील दिले जाऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र यामध्ये विमानांच्या किमतींचा सुरक्षिततेशी फारसा संबंध नाही. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेल्या माहितीमुळेच राफेल खरेदीतील पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.’’

Web Title: Congress has given opportunity to popular faces