esakal | शरद पवारांच्या 'ती लहान माणसं' वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar nana patole

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच आघाडी सरकारच्या अनुषंगाने पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचे म्हटले होते.

शरद पवारांच्या 'ती लहान माणसं' वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच आघाडी सरकारच्या अनुषंगाने पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचे म्हटले होते. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांना विचारल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’. यावर समाजमाध्यमांना पुन्हा प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी ‘शरद पवार महान आहेत’, असं म्हटलंय. (congress leader answer after ncp sharad pawar comment)

शरद पवारांचा आम्ही आदर करतो. त्यांना मी कधीच काही बोललो नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं, असं मी अपेक्षित करणार नाही. कारण, ते आमचे आदरणीय आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी सातत्याने स्वबळाचा नारा दिला आहे. लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना त्यांनी पाठीत सुरा खुपसला जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी थेटपणे राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चांना वेग आला होता.

हेही वाचा: बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस पावसाची शक्यता

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आमचं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले. आपण काही बोलायचं नाही, पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. त्याच्यामुळे आपण कामाला लागा. आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

loading image