पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा झेंडा; अंकिता पाटील यांची माघार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर काँग्रेसचे झुरंगे बिनविरोध
  • अंकिता पाटील यांचा कोणत्याही समिती सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज नाही
  • झुरंगेंनी राजीनामा दिलेले कृषी समितीचे पद रिक्त

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादात अखेर पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी शुक्रवारी (ता. ६) बाजी मारली. झुरंगे हे शुक्रवारी स्थायी समितीवर बिनविरोध निवडून आले.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

या निवडणुकीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे आमदार संजय जगताप ठाण मांडून होते. झुरंगे यांच्या निवडीमुळे तब्बल १ वर्षभरापासून रिक्त असलेली स्थायी समितीची जागा भरली गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

माजी सहकारमंत्री आणि भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मात्र फक्त स्थायीच नव्हे तर, अन्य कोणत्याही समितीच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्जसुध्दा दाखल केला नाही. त्यांचा हा अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे.

रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप

दरम्यान, स्थायी समितीवर सदस्य होण्यासाठी झुरंगे यांनी कृषी समितीवरील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याही समितीच्या सदस्यत्वाच्या नियुक्तीसाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने, ही जागा रिक्त राहिली आहे. सध्या अंकिता पाटील या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीवर सदस्य नसलेल्या एकमेव जिल्हा परिषद सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Dattatray Zurange has been elected on the Pune ZP Standing Committee