पिंपरीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पिंपरी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीमधील आकड्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. मात्र दोन्ही पक्ष आकड्यांबाबत ठाम असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा सत्तेत येण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. हे मिशन-१०० यशस्वी करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 

सुरवातीला काँग्रेसने १२८ पैकी ६४ जागांची मागणी केली. आपल्या पक्षाच्या शक्‍तीनुसार जागा मागाव्यात, अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याने काँग्रेसने ४० जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला. त्यानंतर याबाबत अनेकदा चर्चा झाली. काँग्रेसने हेका सोडून ३० जागांची मागणी केली. मात्र त्या जागाही देण्यास राष्ट्रवादी तयार नाही. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर बुधवारी जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने ४० जागांची मागणी केली होती. बुधवारपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे.’’

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे. यामुळे आम्ही ३० जागांपर्यंत खाली आलो आहोत. मात्र राष्ट्रवादीकडून किती जागा देणार याबाबत स्पष्टपणे सांगण्यात येत नाही.’’

Web Title: Congress-NCP failed chance in Pimpri