'शिवसेनेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱ्या या दोन्ही कायद्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे; परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी केली. 

पुणे - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱ्या या दोन्ही कायद्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे; परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवार पेठेत "आरपीआय'च्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, निमंत्रक ऍड. मंदार जोशी, शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

सीएए आणि एनआरसीवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना आठवले यांनी मात्र मनसेचे नेते राज ठाकरे यांचे मात्र समर्थन केले. ते म्हणाले, ""बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, ते "सीएए' व "एनआरसी'च्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत.'' 

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

"सीएए' व "एनआरसी'बाबत देशातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा असून, हिरावणारा नाही, असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्रावर अन्याय करणारा नसून, देशाला आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने नेणारा आहे. त्यातील योजनांचा फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

"एनआयए' तपासाचे स्वागत 
काही लोकांना वाचविण्यासाठी नव्हे; तर वाचलेल्यांना पकडण्यासाठी एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविले आहे, असे म्हणत रामदास आठवले यांनी केंद्राने हा तपास एनआयएकडे दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP pressure on Shiv Sena