कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या एकत्र प्रचार सभा - रमेश बागवे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - ""कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची आघाडी उघडणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या एकत्रित सभांना लवकरच सुरवात होईल,'' अशी माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली. 

पुणे - ""कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची आघाडी उघडणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या एकत्रित सभांना लवकरच सुरवात होईल,'' अशी माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली. 

पुणे महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रथमच निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. मात्र संयुक्त प्रचार होत नसल्याचे निरीक्षण पत्रकारांनी नोंदविले. याबाबत बागवे म्हणाले, ""दोन्ही कॉंग्रेसने एकत्र काम केले असल्याने या निवडणुकीतही आघाडीचा प्रचार एकत्रित केला जात आहे. काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती असल्या तरीही दोन्ही पक्षांचे नेते आघाडीचा प्रचार करणार आहेत. त्यासाठी एकत्रित सभाही होतील. त्याचे नियोजन करण्यात येत असून, लवकरच ते जाहीर केले जाईल.'' 

दोन्ही पक्षांचे नेते शहरात संयुक्त प्रचार करणार आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यात दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडीबद्दल बोलताना बागवे म्हणाले, ""स्थानिक पातळीवरील विचार घेऊन आघाडीबाबत निर्णय घ्यावा, असे पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते. त्यामुळे ही आघाडी झाली.'' 

माजी खासदार सुरेश कलमाडी यांना कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते भेटले, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ""कलमाडी पक्षाचे नेते होते. पंधरा वर्षे त्यांनी या पक्षासाठी काम केले आहे. काही कार्यकर्ते त्यांना भेटले याचा कोणताही अर्थ काढू नये. त्यांचा पक्षाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना कार्यकर्ते भेटले म्हणजे ती गटबाजी आहे असे नाही.'' 

Web Title: congress Ncp Together rallies